पंतप्रधानपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विरोधकांच्या आक्षेपांवर ठोस अशी भूमिका मांडणारे भाषण केले. दिल्लीमध्ये शनिवारी झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जागतिक व्यापारी संघटनेसंदर्भातील भारताने घेतलेली भूमिका योग्य असल्याचे सांगितले. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताबद्दल अनेक गैरसमज पसरविण्यात येत आहेत, भारताला एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये कौतुकाचे धनी होण्यापेक्षा देशातील शेतकरी आणि गरीबांच्या हिताला सरकारने प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तर देताना, निवडणुकीत हरल्यामुळे विरोधक व्होटबँकेचे राजकारण करत असल्याचेही त्यांनी म्हटले.