News Flash

१ कोटी १० लाख लोकसंख्येच्या वुहानमध्ये सगळयांचीच होणार करोना टेस्ट

आठ एप्रिलला ७६ दिवसानंतर वुहान शहर लॉकडाउनमधुन मुक्त झाले.

१ कोटी १० लाख लोकसंख्येच्या वुहानमध्ये सगळयांचीच होणार करोना टेस्ट
दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता इथली परिस्थिती पूर्वपदावर येत असून गेल्या शनिवारपासून इथे मेट्रो सेवा आणि सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत.

वुहानमध्ये पुन्हा करोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने शहरातील सर्व नागरिकांची करोना चाचणी करण्याची प्रशासनाची योजना आहे. वुहानमधील संपूर्ण लोकसंख्येची करोना चाचणी करण्यात येणार आहे. चीनमधील प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

वुहान शहराची लोकसंख्या एक कोटी १० लाख आहे. चीनच्या वुहान शहरातूनच जगभरात करोना व्हायरसचा फैलाव झाला. ‘वुहानमधील प्रत्येक जिल्ह्याने दहा दिवसांच्या आत योजना बनवून सर्व नागरिकांची चाचणी करावी’ असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

आठ एप्रिलला ७६ दिवसानंतर वुहान शहर लॉकडाउनमधुन मुक्त झाले. त्यानंतर पुन्हा वुहानमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस सहा नवीन रुग्ण आढळले आहेत. चीनने मोठया प्रमाणात करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहे. त्यानंतर आता पुन्हा दुसरी लाट येण्याची चिन्हे आहेत. वुहानमध्ये करोना व्हायरसमुळे ३,८६९ नागरिकांचे मृत्यू झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 6:44 pm

Web Title: wuhan to test entire population after new virus cluster dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये भाजपा आमदाराच्या मुलाची राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी, व्हिडीओ व्हायरल
2 Coronavirus : 24 तासांत बीएसएफचे नऊ व आयटीबीपीचे दोन जवान पॉझिटिव्ह
3 लॉकडाउनचे ४७ दिवस ट्रकमध्ये काढणारा ड्रायव्हर म्हणतो, अजूनही वाटतं मी…
Just Now!
X