एकेकाळी WWF खेळात आपली दहशत राखणारा ‘द केन’ म्हणजेच ग्लेन जेकब्ज हा अमेरिकेतील एका शहराचा मेयर म्हणून विराजमान होणार आहे. टेनेसीमधील नॉक्स कौंटी या शहराच्या महापौरपदी तो १ सप्टेंबरपासून पदभार स्वीकारणार आहे. रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार ३१ हजार ७३९ मते मिळाली. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या लिंडा हेलीला १६ हजार ६११ मते मिळाली. मधल्या काळात त्याने WWF खेळात परतण्याचे संकेत दिले होते. मात्र आता राजकारणाच्या रिंगणात केन आपले नशीब आजमावणार असल्याचे दिसत आहे.