तीन दिवसीय चीन दौऱयावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरूवारी चीनच्या शियान विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावरील स्वागत आणि आदरातिथ्याबाबत मोदींनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे आभार व्यक्त केले. तसेच हा माझा सन्मान नसून १२५ कोटी भारतीय जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी आलो आहे. त्यामुळे हा संपूर्ण भारतीय जनतेचा सन्मान आहे, असे मोदी म्हणाले. क्षी जिनपिंग यांनी यावेळी अहमदाबाद दौऱयाची आठवण करून दिली. मोदींनी त्यांच्या मायभूमीत मोठ्या आदरातिथ्याने माझे स्वागत केले होते. यावेळी माझ्या मायभूमीत मोदींचे स्वागत करताना मला आनंद होत असल्याचे जिनपिंग म्हणाले.
दरम्यान, मोदी आणि जिनपिंग यांच्यात उच्च स्तरिय चर्चेला गुरूवारपासून सुरूवात झाली. याचर्चेत दोन्ही देशांचा सीमाप्रश्न आणि पाकयुक्त काश्मीरमध्ये चीनची उत्सुकता या महत्त्वाच्या विषयांवर खल होण्याची शक्यता आहे.india-china_talks_759