08 March 2021

News Flash

४ जीबी रॅम असलेला शिओमी एम आय ६ याच महिन्यात होणार लाँच

११ एप्रिल रोजी हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे

भारतीय बाजारपेठेत शिओमीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून बाजारात येणार अशी चर्चा असलेला शिओमीचा एमआय ६ हा फ्लॅगशिप फोन या महिन्यात बाजारात येणार असल्याचे कंपनीचे मुख्याधिकारी लेई जून यांनी म्हटले आहे. ४ जीबी रॅमच्या फोनमुळे बाजारात या फोनला मोठी मागणी असणार आहे. सर्वच पातळीवर अद्ययावत अशा फोनची किंमत देखील या फीचर्सच्या इतर स्मार्टफोनच्या तुलनेत कमीच असेल. हा फोन ११ किंवा १८ एप्रिलला लाँच होईल.  भारतीय बाजारपेठ खूप मोठी आहे, आणि या बाजारपेठेत ग्राहकांचे स्वस्त, सुंदर, टिकाऊ वस्तूंना जास्त प्राधान्य असते हे वेगळे सांगायला नको आणि हेच ओळखून ‘शिओमी’ कंपनीने आपले नवे स्मार्ट फोन भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत. भारतीय बाजारपेठेत शिओमीला चांगली मागणी आहे.
या फोनची वैशिष्ट्ये ही असू शकतात

५.५ इंचांचा फुल एचडी डिस्प्लेला २.५ डी कर्व्ह ग्लास बसवण्यात आला आहे. १९ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि स्लो मोशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगचे फिचर्स यात असणार आहे. शिओमीने यात स्नॅपड्रॅगनचा ८३५ ऑक्टा कोर प्रोसेसर बसवला असून ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ३२ जीबी, ६४ जीबी आणि १२८ जीबी अशा तीन प्रकरात हा फोन उपलब्ध असणार आहे. या फोनची किंमत २० ते २५ हजारांच्या आसपास असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फोनची किंमत १९,९९० रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. इंटरनल मेमरी जास्त असलेला फोन घेतल्यास त्याची किंमत वाढू शकते.
‘रेडमी नोट थ्री’च्या यशानंतर शिओमीने ‘रेडमी नोट फोर’लाँच केला होता त्यालाही ग्राहकांकाडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी लाँच केलेल्या या फोनची किंमत १० ते १२ हजारांच्या आसपास होती. भारतीय बाजारपेठेत या वर्षी सुमारे ७० लाख हँडसेटची विक्री करण्याचा शिओमीचा मानस आहे. सध्या शिओमीचे भारतीय मोबाईल मार्केटमधलं स्थान हे दुस-या क्रमांकावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 7:01 pm

Web Title: xiomi mi 6 launch ceo lei jun xiomi redmi smartphone best smartphone to buy india
Next Stories
1 जनतेच्या पैशांवर इतकी मजा मुघलांनीदेखील मारली नव्हती; भाजपची केजरीवालांवर जोरदार टीका
2 जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया बंद करा; मेहबुबांनी पाकला सुनावले
3 चीनने नकाराधिकार वापरला तरी अमेरिका मसूद अजहरवर कारवाई करणारच
Just Now!
X