News Flash

प्रतीक्षा संपली! १९ जानेवारीला ‘रेडमी नोट ४’ भारतात होणार लाँच

या फोनची किंमत ९ ते १२ हजार दरम्यान असेल असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे.

हा फोन तीन व्हॅरियन्ट्समध्ये उपलब्ध आहे

चीनची कंपनी शिओमीचा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लवकरच लाँच होणार आहे. कंपनीने १९ जानेवारीला हा फोन भारतात लाँच करण्याचे ठरवले आहे. रेडमी नोट हा शिओमीचा फ्लॅगशिप ब्रॅंड असून या फोनची आतुरतेने वाट पाहिली जात होती. भारतीय बाजारपेठेमध्ये शिओमीला जोरदार मागणी असून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण डिजाईन आणि अद्ययावत तंत्रज्ञानासाठी हा फोन ओळखला जातो. चीनमध्ये मागील वर्षी ऑगस्टमध्ये हा फोन लाँच झाल्यानंतर हा फोन भारतात कधी येतो याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती.

रेडमी नोट ४ हा फोन दोन व्हॅरियन्ट्समध्ये उपलब्ध होणार आहे. २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या फोनची किंमत ९,००० रुपये असेल तर ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या फोनची किंमत १२,००० रुपये राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोनेरी, राखाडी आणि चंदेरी रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होईल. या फोनला फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. ड्युएल सिमवर चालणाऱ्या या फोनला अॅंड्रॉइड ६.० मार्शमेलो ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.

या फोनची स्र्कीन ५.५ इंच असेल, २.५ डी कर्व्हड ग्लास आणि ४०१ पिक्सेल डेन्सिटी ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत. या फोनला १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असेल. एलईडी फ्लॅश ऑटोफोकस असणार आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल कॅमेरा आहे. या फोनची मेमरी १३२ जीबी एक्सपांडेबल एक्सटेंशनसह आहे. फिंगरप्रिंट स्कॅनरसह इंफ्रारेड सेन्सर देखील या फोनला आहेत. कनेक्टिविटीच्या बाबतीतही हा फोन अद्ययावत आहे. जीपीआरएस, एज, ३जी, ४जी, ब्लूटूथ, जीपीआरएस ही कनेक्टिविटीची साधने या फोनमध्ये उपलब्ध आहेत.

सुरुवातीच्या काळात चीनमध्ये शिओमीला मोठी मागणी होती. शिओमी हा स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत अव्वल स्थानी होता परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये चीनमधील या फोनच्या विक्रीला उतरती कळा लागली. गेल्या काही दिवसांपासून चीनच्या स्मार्टफोन बाजारपेठेत मोठी उलथापालथ झाली आहे. अत्तापर्यंत सर्वात वरच्या स्थानावर असलेल्या शिओमीच्या विक्रीमध्ये ३८ टक्क्यांनी घट झाली असल्याचे ‘आयडीसी’ या प्रतिष्ठित संस्थेनी केलेल्या पाहाणीतून समोर आले. तर दुसरीकडे शिओमीला मात देत हुवाई ही कंपनी सध्या चीनमध्ये वरचढ ठरली आहे. हुवाई नंतर ओप्पो, व्हिवो अशा कंपन्या आघाडीवर आहेत तर आतापर्यंत अव्वल असलेली शिओमी ही चौथ्या क्रमांकावर आली आहे. तर जगभरात प्रसिद्ध असलेली अॅप्पल ही कंपनी चीनच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 4:06 pm

Web Title: xiomi redmi note 4 india launch smartphone flagship brand know price specification
Next Stories
1 मोदीबाबू प्लॅस्टिक मनीचे विक्रेते झाले आहेत; ममता बॅनर्जींची टीका
2 राहुल गांधी विदेशातून परतले; निवडणूक कामाला लागले!
3 VIDEO: व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावेळी अपघात, वायूदलाचा जवान जखमी
Just Now!
X