आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाला शुक्रवारी आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, बुखारी यांच्या भूमिकेला खुद्द त्यांच्या भावानेच विरोध दर्शविला आहे. प्रभावी धार्मिक नेते असलेल्या बुखारी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर मुसलमानांना काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करण्याचे आवाहन केले होत़े त्यामुळे वादंग निर्माण झाले होत़े. बुखारी यांचे बंधू याह्या बुखारी यांनी कॉंग्रेसने इतक्‍या वर्षांमध्ये मुसलमानांसाठी काय केले, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच ज्या ठिकाणी पक्ष सत्तेत नाही, तिथे निवडणुकीपूर्वी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी कॉंग्रेस तेथे दंगलींना प्रोत्साहन देते, असा आरोपही याह्या बुखारी यांनी केला.