News Flash

“तबलिकी जमातवर गुन्हा दाखल केला, पण नमस्ते ट्रम्प कार्यक्रम घेऊन करोना पसरवणाऱ्यांचं काय?”

नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता टीका

अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेला नमस्ते ट्रम्प कार्यक्रम पुन्हा चर्चेत आला आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनावरून मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. “ज्यांनी अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित करून करोना पसरवला, त्यांचं काय?,” असा सवाल यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये करोना पसरल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनीही असा आरोप केला होता.

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनीही गुजरातमधील करोनाजन्य परिस्थितीवरून नमस्ते ट्रम्प कार्यक्रमावर शंका उपस्थित केली आहे. सिन्हा यांनी एक ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे. “करोनाचा प्रसार केला म्हणून तबलिकी जमातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कदाचित ते बरोबरही होत. पण त्यांचं काय, ज्यांनी अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करुन करोना पसरवला?,” असं सवाल सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचा नामोल्लेख न करता केला आहे.

आणखी वाचा- राहुल गांधींना कोणीच गांभीर्याने घेत नाही; भाजपाचा पलटवार

नमस्ते ट्रम्प व करोना; काँग्रेस काय म्हणाली होती?

नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये करोना पसरला, असा दावा गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी केला होता. “जागतिक आरोग्य संघटनेनं जानेवारीमध्येच करोनाचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचं आवाहन त्याचवेळी आरोग्य संघटनेनं केलं होतं. मात्र, आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून राजकीय लाभासाठी नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्याला गुजरात सरकारनंही परवानगी दिली. या मोठ्या कार्यक्रमामुळे हजारो परदेशी नागरिक अहमदाबादला आले आणि त्यामुळे करोना पसरला,” असा आरोप काँग्रेसनं केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 3:52 pm

Web Title: yashwant sinha raised question about namste trump bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 देशातील ‘या’ १३ शहरांमध्ये लॉकडाउन आणखी कठोर होणार?
2 केंद्राकडून सहकार्य मिळालं नाही असं म्हटलंच नाही : संजय राऊत
3 “करोना हा पत्नीसारखा असतो. आधी तुम्ही…”; मंत्र्याच्या वक्तव्यावरुन ‘या’ देशात नवा वाद
Just Now!
X