News Flash

हैदराबादेतील स्फोटाचे आदेश पाकमधूनच

अटकेत असलेला इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या यासिन भटकळ याने या वर्षी हैदराबादेत बॉम्बस्फोट घडविल्याचे

| September 2, 2013 01:53 am

अटकेत असलेला इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या यासिन भटकळ याने या वर्षी हैदराबादेत बॉम्बस्फोट घडविल्याचे कबूल केल़े  हे स्फोट घडविण्यासाठी पाकिस्तानातील सूत्रधाराकडून सूचना मिळाल्याचेही त्याने सांगितले आह़े
हैदराबादमधील दिलसुखनगर येथे विविध ठिकाणी पेरण्यासाठी आपण एका माणसाला स्फोटके पुरविल्याचेही  भटकळ याने चौकशीत सांगितल्याचे समजते.  परदेशी कंपन्यांनी भारतातून विस्तार करण्यापासून माघार घ्यावी, यासाठी आपल्याला पाकिस्तानातील सूत्रधाराने हैदराबादेत स्फोट घडविण्याच्या सूचना दिल्याचेही त्याने सांगितल़े  पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्ब पेरताना त्याने गर्दी असणाऱ्या दुकानाची निवड केल्याचे त्याने सांगितल़े
दिलसुखनगर येथे २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत १७ लोकांचा बळी गेला होता; तर १३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्यातील जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला होता़  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 1:53 am

Web Title: yasin bhatkal says orders placed for hyderabad bomb blast from pakistan
टॅग : Yasin Bhatkal
Next Stories
1 वैद्यकीय तपासणीसाठी सोनिया अमेरिकेत
2 लहान मुलांसाठी घातक ठरणाऱया ‘त्या’ औषधावर बंदीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका
3 सीरिया सज्ज
Just Now!
X