इंडियन मुजाहिदीनचे दहशतवादी मेंगलोरमध्ये बॉम्बची निर्मिती नक्की कुठे करीत होते, याचा छडा लावण्यात एनआयएच्या अधिकाऱयांना यश आले. गेल्या महिन्यात पकडलेल्या यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनआयएने मेंगलोरमधील एका सदनिकेवर छापा टाकला आणि तेथून बॉम्ब बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल हस्तगत केला. यावर्षी २१ फेब्रुवारीला हैदराबादेत झालेल्या दोन बॉम्बस्फोटांसाठी बॉम्बची निर्मिती याच सदनिकेमध्ये करण्यात आली होती.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या वेळी यासिनसोबत कोण होते?
मेंगलोरमधील अट्टावर भागातील झेफीर हाईट्स या इमारतीच्या तिसऱया मजल्यावर ही सदनिका आहे. या सदनिकेचा शोध घेण्यासाठी एनआयएचे अधिकारी असदुल्ला अख्तर याला विशेष विमानाने मेंगलोरला घेऊन आले होते. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गेल्या शनिवारी एनआयएने ही सदनिका शोधून काढली.
दाऊदला पकडण्यासाठी भारताला अमेरिकेची मदत
या सदनिकेमधून ५० डिजिटल घड्याळे जप्त करण्यात आली. यापैकी काही घड्याळांना वायरी जोडलेल्या आहेत. याशिवाय काही सेलफोन, तीन इलेक्ट्रिक डिटोनेटर्स, १२५ ग्रॅम अमोनियम नायट्रेट जेल, इंधन, बॉम्ब सर्किट संदर्भातील एक छोटी पुस्तिका इत्यादी वस्तूही या सदनिकेमधून जप्त करण्यात आल्या. इंडियन मुजाहिदीनची ‘बॉम्ब लॅब’ म्हणूनच ही सदनिका ओळखली जात होती.
‘त्या’ स्फोटाचा बदला घेण्यासाठीच भटकळने केले हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट
या सदनिकेमध्ये आपण सहा महिने राहात होतो, अशी कबुली असदुल्ला अख्तरने एनआयएकडे दिली. फेब्रुवारीमध्ये हैदराबादेत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर मार्च महिन्यापर्यंत तो इथेच होता, असेही त्याने कबुल केले.