News Flash

China: वयाच्या पन्नाशीनंतरही तिशीतले तारुण्य जपणारी महिला!

चीनमधील हेनान प्रांतात राहणाऱ्या ये वेन या ५० वर्षांच्या आहेत

ye wen, china
ये वेन यांचे छायाचित्र (सौजन्य - ट्विटर हॅंडल )

सोशल मीडियावर सध्या एका महिलेची जोरदार चर्चा आहे. चर्चेच कारणही तसं खासच म्हणावं लागेल. चीनमधील या महिलेचे फोटो बघितल्यावर तुम्ही तिच्या वयाचा अंदाज अजिबात लावू शकणार नाही. किंबहुना तिचं खरं वय समजल्यावर त्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. पण दररोज पोहण्याचा आणि इतर व्यायाम केल्यामुळे उतारवयातही व्यक्ती आपले तारुण्य कायम ठेवू शकते, हेच या उदाहरणातून समोर आले आहे.
चीनमधील हेनान प्रांतात राहणाऱ्या ये वेन या ५० वर्षांच्या आहेत. त्यांना एक मुलगाही आहे. पण रोजच्या व्यायामुळे त्यांनी आपले शरीर एकदम सुडौल ठेवले आहे. त्यांची छायाचित्रे बघितल्यावर त्यांचे वय इतके जास्त आहे, यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. वयाच्या ३० वर्षांपर्यंत व्यायामाबाबत फारशा जागरूक नसलेल्या ये वेन यांनी तिशीनंतर त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. वाढत्या वयातही आपल्याला फिट राहता आलेच पाहिजे, एवढे एकच त्यांनी मनोमन ठरवले आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करत राहिल्या. घराजवळील जलतरण तलावामध्ये ये वेन रोजच्या रोज पोहण्याचा व्यायाम करतात. त्याचबरोबर इतरांना त्या पोहण्याचे प्रशिक्षणही देतात. यासोबतच आठवड्यातून तीन ते चार वेळा त्या व्यायामशाळेत जाऊन दोन-दोन तास कठोर व्यायाम करतात. वयाच्या ८० वर्षापर्यंत असेच फिट राहण्याची त्यांची इच्छा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 2:03 pm

Web Title: ye wen from china 50 years old but looks decades younger
टॅग : China
Next Stories
1 VIDEO : …जेव्हा महिला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा मुका घेते!
2 सातवा वेतन आयोग लवकरच लागू?
3 गुरूत्वीय लहरींचे निरीक्षण अवकाशस्थ उपकरणातून शक्य
Just Now!
X