21 January 2021

News Flash

१० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघांना भरचौकात फाशी

येमेनमधील साना येथे १० वर्षांच्या मुलावर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. या तिन्ही नराधमांना स्थानिक पोलिसांनी अटक केली.

शिक्षेच्या या पद्धतीवर मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

येमेनमध्ये १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन नराधमांना भरचौकात फाशी देण्यात आली. फाशी देण्यापूर्वी त्या तिघांवर बंदुकीने गोळ्या देखील झाडण्यात आल्या.

येमेनमधील शरिया कायदा लागू असून यानुसार गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. असे गुन्हे करण्याची हिंमत कोणी करु नये, यासाठी येमेनमध्ये अशा शिक्षेची तरतूद असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. येमेनमधील साना येथे १० वर्षांच्या मुलावर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता.  अत्याचारानंतर त्या मुलाची हत्या करण्यात आली होती. या तिन्ही नराधमांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. या तिघांनाही नुकतीच भरचौकात फाशीची शिक्षा देण्यात आली. मात्र, शिक्षेच्या या पद्धतीवर मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

‘तिन्ही आरोपींना सानामधील भरचौकात आणले गेले. त्या तिघांवर आधी चार गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर त्यांना क्रेनद्वारे फाशीची शिक्षा देण्यात आली’, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 11:59 pm

Web Title: yemen three men who raped killed 10 year old boy publicly executed
Next Stories
1 मायावती यांनी नेतृत्व केलं तर मोदींचा पराभव निश्चित: जिग्नेश मेवाणी
2 भाजपाला पाठिंबा देणे ही नवीन पटनायक यांची घोडचूक: चिदंबरम
3 पाकिस्तानी अभिनेत्रीची पतीकडून गोळ्या घालून हत्या
Just Now!
X