12 July 2020

News Flash

येमेन वगळता १९२ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

संघर्षग्रस्त येमेनवगळता आंतरराष्ट्रीय योग दिन १९२ देशांमध्ये साजरा करण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

| June 25, 2015 02:18 am

संघर्षग्रस्त येमेनवगळता आंतरराष्ट्रीय योग दिन १९२ देशांमध्ये साजरा करण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
मंत्रिमंडळाची बैठक संपताच सदस्यांना भारतात आणि जगभरात साजऱ्या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती देण्यात आली.
भारतीय दूतावास नसलेला येमेनवगळता १९२ देशांमध्ये योग दिनाचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला, असे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. जगातील ४४ हून अधिक इस्लामी देशांमध्येही योग दिन साजरा करण्यात आला, असेही ते म्हणाले.
दरम्यान, रक्षाबंधनाचा उत्सवही मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्याबाबत रविशंकर प्रसाद आणि गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2015 2:18 am

Web Title: yoga day observed in 192 countries yemen only exception govt
Next Stories
1 खासदारांना सहा रूपयांत मसाला डोसा
2 फ्रान्सच्या तीन अध्यक्षांवर अमेरिकेची हेरगिरी
3 केरळात आयुर्वेद प्रसारासाठी स्टेफी ग्राफ सदिच्छादूत
Just Now!
X