16 February 2020

News Flash

योगासनांमुळे वैद्यकीय खर्चात कपात

आजारी पडू नये यासाठी काय करावे, तर योगासने करावी, असे या डॉक्टरांनी सांगितले.

दररोज नित्यनियमाने योगासने केल्यास उत्तम आरोग्य लाभते,

अमेरिकी डॉक्टरांचा निष्कर्ष
योगासने ही भारताने जगाला दिलेली देणगी. दररोज नित्यनियमाने योगासने केल्यास उत्तम आरोग्य लाभते, आरोग्यविषयक समस्या बहुधा उद्भवत नाहीत. योगासनांचे महत्त्व आता जगालाही पटू लागले आहे. अमेरिकी डॉक्टर, आरोग्यतज्ज्ञ सातत्याने योगासनांवर अभ्यास करत असून, हार्वर्ड विद्यापीठाच्या डॉक्टरांनी तरी नियमित योगसनांमुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवत नसल्याने वैद्यकीय खर्चही कमी होतो, असा निष्कर्ष काढलेला आहे.
आजारी पडू नये यासाठी काय करावे, तर योगासने करावी, असे या डॉक्टरांनी सांगितले. हार्वर्ड विद्यापीठाच्या मॅसेच्युसेट्स रुग्णालयाच्या आणि बेन्सन हेन्री इन्स्टिटय़ूटच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी योगासने, मेडिटेशन, प्रार्थना यांवर सातत्याने अभ्यास केलेला आहे. त्यासाठी त्यांनी योगासनासंदर्भात जाहीर कार्यक्रम, शिबिरे यांचे आयोजन केले होते. आरोग्याची काळजी घेण्यासाठी या गोष्टींची नितांत गरज आहे, त्यामुळे वैद्यकीय खर्चात ४३ टक्क्यांनी कपात होऊ शकते, असे या डॉक्टरांनी सांगितले.
मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी योगासने गरजेची आहेत. योगसनांमुळे चिंता आणि तणावापासून मुक्ती मिळते. त्याशिवाय रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि श्वसनाचा दाब यांवर नियंत्रण राहते. सहसा हृदयविकार व श्वसनविकार होत नाहीत, असे मॅसेच्युसेट्स रुग्णालयाच्या डॉ. जेम्स ई. स्टॉल यांनी सांगितले.

योगासने, मेडिटेशन, दीर्घ श्वासोच्छ्वास, प्रार्थना हे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते. चिंता व अतितणाव यांसारख्या मानसिक आजारांवर नियंत्रण आणण्याचे काम योगासने करतात. नियमित योगासने केल्याने आजारपणावर अधिक खर्च करावा लागत नाही. त्यामुळे वैद्यकीय खर्चात कपात होते.
– डॉ. जेम्स ई. स्टॉल

First Published on October 21, 2015 3:38 am

Web Title: yoga meditation cut medical expenses
टॅग Yoga
Next Stories
1 विचार मांडण्यासाठी विध्वंस धोकादायक! अरुण जेटली यांचा शिवसेनेला टोला
2 हरियाणात दलित कुटुंबाचे घर पेटवले, दोन लहान मुलांचा मृत्यू
3 एफटीआयआयबाबत चर्चा निष्फळ
Just Now!
X