देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली. दोनापौला इथल्या निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशाने प्रामाणिक, मनमिळाऊ आणि लोकसेवेसाठी समर्पित असलेला नेता गमावल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. ऑनस्क्रीन पर्रिकर साकारणारे अभिनेते योगश सोमण यांनीही पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोमण यांनी पर्रिकरांच्या काही आठवणीसुद्धा सांगितल्या. ‘पहिल्याच भेटीत मला पर्रिकरांचा साधेपणा भावला. राजकारणी असले तरी त्यांना साहित्यात फार रुची होती. पु. ल. देशपांडेंच्या साहित्यावर आम्ही चर्चा केली होती. शेवटच्या श्वासापर्यंत मी देशाची आणि गोव्याची सेवा करणार असं ते म्हणाले होते. त्यांच्या शब्दाला ते शेवटपर्यंत जागले,’ असं ते म्हणाले.

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात योगेश सोमण यांनी पर्रिकरांची भूमिका साकारली होती. ‘चेहऱ्यातील अंशत: साम्यामुळे काही काळापुरतं का होईना मला त्यांची ओळख मिळाली हे मी माझं भाग्य समजतो,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केली. त्याचप्रमाणे भविष्यात पर्रिकरांच्या जीवनावर आधारित एखादा माहितीपट किंवा डॉक्युड्रामाची निर्मिती होत असल्यास त्यात मला पर्रिकरांची भूमिका करायला आवडेल असंही ते म्हणाले.