05 December 2020

News Flash

लष्करातील जवानांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्यांना गोळ्या घाला- योगेश्वर दत्त

कुस्तीपटू योगेश्वरने एएनआयला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्याने हे वक्तव्य केले.

कुस्तीपटू योगेश्वरने एएनआयला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्याने हे वक्तव्य केले.

जम्मू काश्मीरमध्ये लष्करातील जवानांवर काही आंदोलकांनी हात उगारला, त्यांना मारले असा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना ऑलिम्पिकपटू योगेश्वर दत्त म्हणाला आहे की जवानांवर हात उगारणाऱ्या लोकांना गोळ्या घालून ठार करा योगेश्वर दत्तने एएनआयला म्हटले आहे.

आपल्या देशाचे जवान आपल्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देतात. त्यांच्यामुळेच आपण सुखाने झोपू शकतो. जर त्यांचा कुणी अशा प्रकारे अपमान करत असेल तर त्यांना ठार करा असे वक्तव्य योगेश्वरने केले आहे.  काश्मीरमध्ये जे घडले ते अतिशय चुकीचे आहे. आपल्या जवानांना त्याठिकाणी अपमानित केले गेले.

त्यांना मारहाण करण्यात आली. हा  सर्व प्रकार दुःखद आहे असे योगेश्वरने म्हटले. जर कुणी आपल्या जवानांसोबत अशी वर्तणूक करत असेल तर त्याला गोळ्या घालूनच ठार करायला हवे असे योगेश्वर दत्तने एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. काश्मीरमध्ये जो प्रकार घडला त्या परिस्थितीमध्ये जवानांनाच कारवाई करण्याचे अधिकार द्यायला हवे असे योगेश्वरने पुढे म्हटले. जर जवानांला अधिकार दिले तर असे प्रकार तत्काळ थांबतील असे योगेश्वरने म्हटले.

yogeshwar_149234765321_650x425

याआधी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने देखील या व्हिडिओबाबत चिंता व्यक्त केली होती. आपल्या जवानांचा अशा प्रकारे होणारा अपमान हा कुठल्याही परिस्थिमीमध्ये स्वीकारता येणार नाही असे सेहवागने म्हटले होते. क्रिकेटपटू गौतम गंभीरने देखील या प्रकारावर चिंता व्यक्त केली होती. जवानांना मारलेल्या एका थपडेच्या बदल्यात १०० जिहादींना ठार करा असे गौतम गंभीरने म्हटले होते.

श्रीनगरमध्ये पोटनिवडणुकीनंतर ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. स्थानिक तरुणांनी सीआरपीएफच्या जवानांना मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ बघून देशभरात संतापाची लाट उसळली होती. सशस्त्र जवान तरुणांनी लाथ मारल्यावरही शांतपणे निघून गेले होते. त्यांनी जवानांना प्रत्युत्तर देणे टाळले होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर क्रिकेटपटू गौतम गंभीरने ट्विटरवरुन आपला संताप व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 6:38 pm

Web Title: yogeshwar dutta statement on jammu kashmir video
Next Stories
1 ईव्हीएममध्ये घोळ असण्याची ओरड केवळ दिल्ली निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊनच- मोदी
2 VIDEO: अमेरिकेतील टाईम्स स्क्वेअरवर शीख समुदायाकडून पगडी दिन साजरा
3 मुस्लिमांमधील मागासवर्गीय घटकांपर्यंत पोहोचण्याची गरज- पंतप्रधान मोदी
Just Now!
X