भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी योगाभ्यासाबाबत अलीकडेच केलेल्या विधानावर उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी हल्ला चढविला आहे. आपले मानसिक संतुल राखण्यासाठी आदित्यनाथ यांनी नमाज पढावा, असे आझम खान यांनी म्हटले आहे. आदित्यानाथ यांना नमाज पढण्याबाबतचा दिलेला सल्ला कदाचित योग्य नसेल, परंतु कोणताही व्यायामासाठी आदित्यनाथ यांना सक्ती करावयाची असेल तर नमाज पढणे सर्वोत्तम व्यायाम आहे, कारण त्यामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक संतुलन राखण्यास मदत होईल, असे आझम खान म्हणाले
जे सूर्यनमस्काराला विरोध करतात त्यांनी समुद्रात जीव द्यावा, असे विधान आदित्यनाथ यांनी केले होते. त्या संदर्भात खान वार्ताहराशी बोलत होते. सूर्यनमस्कार हा धार्मिक व्यायाम असल्याने त्याची कोणावरही सक्ती करता येणार नाही, असेही खान म्हणाले.