News Flash

शाहरूख, हफीज सईद यांची भाषा एकच!

हिंदूंनी शाहरूख खान याचे चित्रपट पाहिले नाहीत तर तो रस्त्यावर येईल, असेही भाजपचे खासदार म्हणाले

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi
भाजपचा एक फायर ब्रॅंड नेता अशी योगी आदित्यनाथ यांची ओळख आहे

आदित्यनाथ यांच्या विधानाने नवा वाद; पाकिस्तानात जाण्याचा सल्ला

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान याची तुलना दहशतवादी हफीझ सईदशी करून भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी नव्या वादाला तोंड फोडले. शाहरूख आणि सईद यांची भाषा एकच आहे. त्यामुळे सईदने निमंत्रण दिलेच असेल तर आता शाहरुखला पाकिस्तानला जायला हरकत नाही, असा टोला आदित्यनाथ यांनी लगावला.
हिंदूंनी शाहरूख खान याचे चित्रपट पाहिले नाहीत तर तो रस्त्यावर येईल, असेही भाजपचे खासदार म्हणाले. पुरस्कार परत करणारे साहित्यिक, कलावंत, लेखक, चित्रपट निर्माते यांच्यावरही आदित्यनाथ यांनी हल्ला चढविला आहे. डाव्या विचारसरणीचे लेखक आणि कलाकार यांनी देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी केली आहे, तेही दहशतवादाची भाषा करू लागले आहेत, असे आदित्यनाथ म्हणाले. देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल मान्यवरांकडून पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरू झाले असून त्याबद्दल शाहरूखने नाराजी व्यक्त केली होती. वाढत्या असहिष्णुतेविरोधात लढण्याची तयारीही त्याने दर्शविली होती. त्यानंतर शाहरूख भारतात राहात असला तरी त्याचा आत्मा पाकिस्तानात असल्याची टीका भाजपचे नेते विजयवर्गीययांनी केली. मात्र त्यामुळे त्यांच्यावर टीका झाल्याने त्यांनी हे वक्तव्य मागे घेतले.

शाहरुख खान हा पूर्ण देशाचा आदर्श आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्यामुळे भाजपच्या काही सदस्यांनी आपल्या बेजबाबदार विधानांवर नियंत्रण ठेवावे.
– अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेते यांचे ‘ट्विट’

बॉलीवूड किंग खानच्या पाठीशी

प्रतिनिधी, मुंबई
भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी हिंदी चित्रपटातील अभिनेता शाहरुख खान याची तुलना पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्याशी केली. यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी अदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी या घटनेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या शाहरुख खानची तुलना पाकिस्तान दहशवादी हाफिज सईद याच्याशी करणे ही बाब अत्यंत निंदनीय आहे. शाहरुख खान हा पूर्ण देशाचा आदर्श आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्यामुळे भाजपच्या काही सदस्यांनी आपल्या बेजबाबदार विधानांवर नियंत्रण ठेवावे अशा तीव्र शब्दांत खेर यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.

खानांनी सहिष्णुता शिकवू नये..

शिवसेनेचा टोला

विशेष प्रतिनिधी, मुंबई
असहिष्णुता वाढत असल्याचे मत व्यक्त करणारा सुप्रसिध्द अभिनेता शाहरुख खान याच्यावर शिवसेना घसरली असून ‘खानांनी’ सहिष्णुता शिकवू नये, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. खान यांच्याविरुध्द शिवसेना पुढील काळात आक्रमक भूमिका घेण्याचीही शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शाहरुखने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आदर्श ठेवावा. देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच असहिष्णुता आहे, असे ज्येष्ठ अभिनेता कमल हसन यांनी व्यक्त केलेले मत बरोबर असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. हा देश सहिष्णु आहे; म्हणूनच सारेजण सहिष्णु आहेत, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2015 5:24 am

Web Title: yogi adityanath slams srk compares him with hafiz saeed
टॅग : Yogi Adityanath
Next Stories
1 न्या. टी. एस. ठाकूर नवे सरन्यायाधीश
2 निवडणूक आयोगाचा भाजपला हिसका
3 पंजाबमध्ये पुन्हा धर्मग्रंथाची विटंबना
Just Now!
X