24 November 2020

News Flash

उत्तर प्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ विरोधात योगी सरकारचा कडक कायदा येणार

राज्याच्या गृह मंत्रालायाने कायदे व विधी विभागाकडे पाठवला प्रस्ताव

संग्रहीत छायाचित्र

उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर आता लवकरच उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे या संदर्भात गृहमंत्रालयाने कायदे व विधी विभागाकडे प्रस्ताव देखील पाठवला आहे.

लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल, असा गंभीर इशारा या अगोदरच दिलेला आहे.

”अलाहाबाद न्यायालयानं निर्णय दिला आहे की, केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही केले गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे. यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे की, लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचं काम केले जावे. सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशार देत आहे जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधाराला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे.” असं योगी आदित्यनाथ यांनी एका सभेत बोलून दाखवलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 5:30 pm

Web Title: yogi government soon tightens law against love jihad in uttar pradesh msr 87
Next Stories
1 ….तर तेजस्वी यादव यांनी देखील राजीनामा द्यावा; जदयूचा पलटवार
2 करोनाचा कहर… ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह; खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा शोध सुरू
3 वाढत्या प्रदूषणामुळे सोनिया गांधींनी सोडलं दिल्ली शहर, काही दिवस मुक्काम गोव्यात
Just Now!
X