News Flash

योगी आदित्यनाथ अर्भकं मृत्यू प्रकरणाचं राजकारण करताहेत : डॉ. काफिल खान

अर्भकं मृत्यू प्रकरणाचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजकारण करीत आहेत, खोटी विधाने करीत ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप डॉ. खान यांनी केला आहे.

डॉ. काफिल खान

गोरखपूर अर्भकं मृत्यू प्रकरणावरुन पुन्हा एकदा वाद-विवाद सुरु झाला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका ताज्या वक्तव्यानंतर या प्रकरणातील आरोपी असलेल्या डॉ. काफिल खान यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्भकं मृत्यू प्रकरणाचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजकारण करीत आहेत, खोटी विधाने करीत ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप डॉ. खान यांनी केला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या अर्भकांचा मृत्यू झाला नव्हता असे योगींनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.


डॉ. खान म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जे म्हटले आहे ते खोटं आहे. या घटनेमध्ये अनेक नवजात अर्भकांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने रुग्णालय प्रशासनाला कळवले होते की, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांची थकीत बिलाची रक्कम चुकती करावी. रुग्णालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच इथला ऑक्सिजनचा पुरवठा रोखण्यात आला होता. त्यानंतर दुर्देवाने ऑक्सिजन अभावी या अर्भकांचा मृत्यू झाला होता.

https://twitter.com/ANINewsUP/status/1034042495368196096
योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात गेल्या वर्षी बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्यात आल्याने एक दिवसांत ३० नवजात अर्भकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाने देशभरात मोठा गदारोळ झाला होता. ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी नव्हे तर अंतर्गत राजकारणामुळेच हे मृत्यू झाल्याचा दावा नुकताच योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात केला होता. या प्रकरणी रुग्णालयातील डॉ. काफिल खान यांना जबाबदार धरण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 5:40 pm

Web Title: yogi ji is doing politics trying to mislead people says dr kafeel khan
Next Stories
1 FB बुलेटीन : राहुल गांधींना संघाचं निमंत्रण, गोध्राप्रकरणी दोघांना जन्मठेप आणि अन्य बातम्या
2 …म्हणून शशी थरुर यांनी सुरु केला #ProudToBeMalayali चा ट्रेंड
3 त्रिपुरात सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स आणि गॉगल वापरण्यास बंदी
Just Now!
X