आयफोन ३ जीएस हा २००९ साली बाजारात आला आणि २०१० मध्ये आयफोन ४ आल्यानंतर त्याची विक्री बंद झाली. हे मॉडेल आता पुन्हा बाजारात येतंय पण दक्षिण कोरियात. मर्यादित स्वरूपात दक्षिण कोरियाच्याा बाजारात आयफोन ३जीएस दाखल करण्याचा कंपनीनं निर्णय घेतलाय. त्याची किंमत ४४ हजार वॉन इतकी म्हणजे भारतीय रूपयांमध्ये २,८०० रुपये इतकी असणार आहे. त्यामुळे जर का दक्षिण कोरियात तुम्ही काही कामानं जाणार असाल किंवा कुणी ओळखीचे जाणाार असतील तर हा आयफोन आणायला सांगायला विसरू नका, कारण इतक्या कमी आयफोन स्वप्नातही मिळत नाही.

व्हेंचरबीटनं अशी बाातमी दिलीय की एसके टेलिंक या कंपनीला त्यांच्या गोदामात या मॉडेलचे आयफोन पडून असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे कंपनी हे फोन बंदिस्त अवस्थेत विकणार नसून ते तपासणार आहेत, व फोन व्यवस्थित सुरू आहेत याची खात्री करूनच विकणार आहेत. आयफोन ३ जीएस हे ही यशस्वी मॉडेल होतं त्यामुळे त्याच्या यंत्रणेचा काही प्रश्न नसेल, मात्र नऊ वर्षांपूर्वीचं फत्पादन असलल्याने काही फोन्सची बॅटरी खराब झाली असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आणि एक समस्या म्हणजे हा फोन ३ जी तंत्रज्ञानापर्यंत चालतो कारण त्याकाळी ४ जी नव्हतं. अर्थात, ज्या किमतीत फीचर फोन येतो त्या किमतीत आयफोन काय वाईट आहे. त्यामुळे बघा काही जुगाड करून इतक्या स्वस्तात आयफोन पदरात पाडता येतो का? लक्षात ठेवा जेव्हा २०१० मध्ये भारतात आयफोन ३ जीएस दाखल झाला तेव्हा त्याची किंमत होती ३५,५०० रुपये फक्त…