29 October 2020

News Flash

अयोध्येत तुम्ही राम मंदिर बांधा, आम्ही बाबरी मशीद बांधतो – फरहान आझमी

"उद्धव ठाकरे सात मार्च रोजी अयोध्येला जाणार असतील तर, मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन"

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले तर, आम्ही सुद्धा मशीद बांधण्यासाठी अयोध्येला जाऊ असे फरहान आझमी यांनी म्हटले आहे. फरहान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. “उद्धव ठाकरे सात मार्च रोजी अयोध्येला जाणार असतील तर, मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन. ते राम मंदिर बांधतील, आम्ही बाबरी मशीद बांधू” असे फरहान आझमी म्हणाले.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाच्यावेळी फरहान आझमी यांनी हे वक्तव्य केले. सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येचा दौरा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे मुस्लिम समाजामध्ये अस्वस्थतता असल्याचे फरहान आझमी म्हणाले.

आणखी वाचा – ठरलं! उद्धव ठाकरे ‘या’ दिवशी जाणार अयोध्येत

उद्धव ठाकरे यांच्या नियोजित कार्यक्रमात कुठलाही बदल होणार नाही असे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले. निवडणुकीआधीच उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला होता. फरहान आझमी जे काही म्हणाले, तो त्यांचा विचार आहे असे सामंत म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 12:56 pm

Web Title: you make ram temple at ayodhya we will make babri masjid farhan azmi dmp 82
Next Stories
1 शरजील इमामची कबुली : ‘जोश’मध्ये केलं ‘ते’ वक्तव्य, व्हायरल व्हिडीओही खरा, पण…
2 देशात इतकी वाईट अवस्था आहे, तरीही काँग्रेसला अजून उभं राहता येत नाही -संबित पात्रा
3 पाच वेळा झाला होता महात्मा गांधींच्या हत्येचा प्रयत्न
Just Now!
X