News Flash

बहुचर्चित iPhone 7 चे फिचर्स!

आयफोन ७ प्लसला दोन कॅमेरा सेटअप देण्यात आले आहेत.

iOS १० वर रन करणाऱ्या आयफोन ७ चा कॅमेरा १२ मेगापिक्सलचा असून कॅमेऱ्यामध्ये हाई-स्पीड सेंसर देण्यात आला आहे.

‘आयफोन सेव्हन’चे अनावरण बुधवारी रात्री  करण्यात आले. या स्मार्टफोनमधून अँटेनाबँड पूर्णपणे घालविण्यात आला असून यामध्ये वापरण्यात आलेले होम बटन हे आत्तापर्यंतच्या आयफोनपेक्षा वेगळे आहे. हे बटन फोर्स सेन्सेटिव्ह आणि टॅपटिक इंजीनसह देण्यात आले आहे. या बटनामुळे पाणी आणि धूळ यापासून स्मार्टफोन सुरक्षित राहण्यास मदत होईल. बारा मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि सात मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा ही या आणखी काही वैशिष्ट्यांपैकी एक असून ‘आयफोन सेव्हन प्लस’मध्ये डय़ुएल लेन्स कॅमेरा देण्यात आला आहे.
आयफोन ७ भारतीयांसाठी महागडाच, ७ ऑक्टोबरला भारतात येणार
*आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस सर्वात चांगला स्मार्टफोन असल्याचा कंपनीने दावा केला आहे. या स्मार्टफोनमधील १० गोष्टी अन्य स्मार्टफोनच्या तुलनेत अधिक फायदेशीर असून यामध्ये कॅमेरा, आणि स्मार्टफोनचा परफॉर्मसची यापूर्वीच चर्चा रंगली होती.
*कंपनीने ग्राहकांसाठी वेगवेगळ्या कलरमध्ये स्मार्टफोन उपलब्ध करुन दिले आहेत. आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस ग्लासी आणि ब्लॅक अशा दोन कलरमध्ये  उपलब्ध होणार आहे.
*त्यामुळे आता आईफोन सिल्वर, गोल्ड, रोज गोल्ड, ब्लॅक (जेट) आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.
iOS १० वर रन करणाऱ्या आयफोन ७ चा कॅमेरा १२ मेगापिक्सलचा असून कॅमेऱ्यामध्ये हाई-स्पीड  सेंसर देण्यात आला आहे.  तसेच क्वॉड-LED, दोन फ्लॅश आणि ५० हून अधिक लाइटसारखे फीचरचा सुविधा देण्यात आली आहे.
Apple iPhone 7 launch: आयफोन ७ आला रे…

*आयफोन ७ प्लसला दोन कॅमेरा सेटअप देण्यात आले आहेत. हे दोन्ही कॅमेरे १२ मेगापिक्सलचे आहेत.
यामध्ये वाइड अॅगल आणि टेलिफोटो मॉडेल असून 2x ऑप्टिकल आणि 10x सॉफ्टवेअरसह झूमचा वापर करता येणे शक्य आहे.

*दोन्ही आयफोनचे फ्रंन्ट कॅमेरे ७ मेगापिक्सलचे आहेत. तसचे दोन्ही स्मार्टफोनला थ्री डी टच देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 5:13 am

Web Title: you should know about iphone 7
Next Stories
1 २५१ रुपयांचा स्मार्टफोन कसा विकत घ्याल..
2 फक्त २५१ रुपयांत स्मार्टफोन!
3 बहुचर्चित ‘आयफोन ६सी’चे फीचर्स लीक
Just Now!
X