05 April 2020

News Flash

रुग्णसेवेसाठी विवाह लांबणीवर टाकलेल्या चिनी डॉक्टरचा मृत्यू

दगावलेल्या कर्मचाऱ्यांना हुतात्मा जाहीर करणार

संग्रहित छायाचित्र

दगावलेल्या कर्मचाऱ्यांना हुतात्मा जाहीर करणार

बीजिंग : करोना रुग्णांवर उपचारासाठी स्वत:चा विवाह लांबणीवर टाकणाऱ्या २९ वर्षीय चिनी डॉक्टरचा संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्याला विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांचा  मृत्यू झाला. आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांपैकी हा नववा मृत्यू झाहे.

वुहान रुग्णालयातील डॉ. पेंग यिनहुआ हे करोनाच्या रुग्णांवर उपचार करीत होते. त्यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. पेंग यांना श्वसनमार्गातही संसर्ग झाला होता. वुहानमधील जियांगशिया जिल्ह्य़ातील फर्स्ट पीपल्स रुग्णालयात ते काम करीत होते. त्यांना संसर्गानंतर २५ जानेवारी रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले नंतर ३० जानेवारीला वुहान जिययिंटन रुग्णालयात हलवण्यात आले पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. पेंग यिनहुआ हे जियांगशिया फर्स्ट रुग्णालयातील आघाडीचे डॉक्टर होते. त्यांनी रुग्णांवर उपचारासाठी स्वत:चा विवाह लांबणीवर टाकला होता.

जे डॉक्टर व कर्मचारी उपचार करीत असताना संसर्गाने मरण पावतील, त्यांना चीन सरकार हुतात्मा जाहीर करणार असून संबंधित रुग्णालयांनी अशा मृत्यू झालेल्यांची नावे कळवावीत, असे सांगण्यात आले आहेत.  याआधी चिनी डॉक्टर ली वेनलियांग यांचा ७ फेब्रुवारीला विषाणूने मृत्यू झाला होता. त्यांनी या विषाणूबाबत सर्वानाच ३० डिसेंबर रोजी वुई चॅट संदेशातून सावध केले होते.

‘भारताच्या विमानाला परवानगीस विलंब नाही’

बीजिंग : वुहानमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी आणि तेथे औषधांचा पुरवठा करण्यासाठी विशेष भारतीय विमानाला परवानगी देण्यास विलंब लावल्याच्या वृत्ताचे चीनने शुक्रवारी खंडन केले. दोन्ही देशांचे संबंधित विभाग एकमेकांशी संपर्क ठेवून वेळापत्रक तयार करीत आहेत, असे चीनने म्हटले आहे. भारतीय हवाई दलाचे जी-१७ या विमानातून वुहानला औषधे पाठविण्यात येणार असल्याचे आणि तेथे असलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याचे भारताने १७ फेब्रुवारी रोजी जाहीर केले. मात्र या विशेष विमानाला अद्याप चीनकडून मान्यता मिळालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 3:01 am

Web Title: young doctor dies who postponed wedding to treat coronavirus patients in china zws 70
Next Stories
1 ‘डायमंड प्रिन्सेस’वरील आठ भारतीयांच्या प्रकृतीत सुधारणा
2 पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा; महिलेविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा
3 भारताच्या चढय़ा आयातकरामुळे अमेरिकेला फटका- ट्रम्प
Just Now!
X