20 September 2018

News Flash

फेसबुकवर लाइव्ह आत्महत्या, २७५० निघाले ‘बघे’

तरुणाने आत्महत्या करण्याआधी फेसबुकवर लाइव्ह करत आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं

पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती न होऊ शकल्याने नाराज झालेल्या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने आत्महत्या करताना फेसबुकवर लाइव्ह करत आपल्या आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं. धक्कादायक म्हणजे तरुण फेसबुक लाइव्ह करत असताना २७५० जण पाहत होते, मात्र एकानेही त्याच्या कुटुंबाला किंवा पोलिसांना फोन करुन कळवलं नाही.

HOT DEALS
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 15375 MRP ₹ 16999 -10%
  • Moto G6 Deep Indigo (64 GB)
    ₹ 15694 MRP ₹ 19999 -22%

तरुणाची ओळख मुन्ना कुमार अशी पटली आहे. मुन्ना कुमार बीएससी ग्रॅज्युएट असून आग्रा येथील शांतीनगरमध्ये राहायचा. बुधवारी सकाळी फेसबुकवर एक मिनिट नऊ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत आपण आत्महत्या करत असल्याचं त्याने सांगितलं. त्याचा हा व्हिडीओ २७५० जण पाहत होते, पण कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. एकालाही त्याच्या कुटुंबाला किंवा पोलिसांना कळवत आत्महत्या करण्यापासून रोखावं असं वाटलं नाही.

तरुणाने सहा पानांची सुसाईड नोट लिहिली असून आपल्या आत्महत्येसाठी आपणच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय लष्करात भरती होऊ न शकल्याने तसंच आई-वडिलांची अपेक्षा पूर्ण न करु शकल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं मुन्नाने लिहिलं आहे.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्नाने पाच वेळा प्रवेश परिक्षा दिली होती. ‘भगत सिंह यांच्यापासून मुन्ना प्रचंड प्रेरित होता. भारतीय लष्करात भरती होणं त्याचं स्वप्न होतं. आत्महत्या करण्याआधी तो नेहमीप्रमाणे वावरत होता. रात्रीदेखील आम्ही एकत्रच जेवलो. कुटुंबातील कोणालाही तो आत्महत्या करेल असं वाटलं नव्हतं’, असं मुन्नाचा भाऊ विकास कुमारने सांगितलं आहे.

First Published on July 12, 2018 12:19 pm

Web Title: youngster live stream suicide on facebook not making indian army