News Flash

पिस्तुले आणि स्फोटकांसह युवकाला अटक

जमालपूर एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या एका युवकाकडून शनिवारी बर्दवान स्थानकात पोलिसांनी आठ अत्याधुनिक पिस्तुले आणि स्फोटकांचा साठा हस्तगत केला.

| July 7, 2013 03:45 am

जमालपूर एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या एका युवकाकडून शनिवारी बर्दवान स्थानकात पोलिसांनी आठ अत्याधुनिक पिस्तुले आणि स्फोटकांचा साठा हस्तगत केला.
सदर युवकाचे नाव प्रणबकुमार सिंग असे असून त्याच्याकडून ९ एमएमची आठ पिस्तुले आणि १६ काडतुसे आणि ७० स्फोटके असा साठा जप्त केला. बिहारमधील मुंगेर येथून आपण हा साठा आणला असून तो कटकमध्ये नेण्यात येत होता, असे सिंग याने चौकशीदरम्यान सांगितले.पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा याच गाडीतून शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत केला होता. सदर गाडी बर्दवान जंक्शन येथे थांबली असता हा साठा पकडण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 3:45 am

Web Title: youth arrested with a revolver and explosives
टॅग : Revolver
Next Stories
1 २६-११च्या हल्ल्याची पाकिस्तानी न्यायालयातील सुनावणी लांबणीवर
2 येमेनमधील स्फोटात तीन पोलीस ठार
3 सीमा करार : लवकर तोडगा काढण्यावर भारत, चीनचा भर
Just Now!
X