28 October 2020

News Flash

दिल्लीत सापडला तरुणाचा मृतदेह, हत्या की आत्महत्या शोध सुरु

पोलिसांकडून तपास सुरु

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्लीत रोहिणी भागात एका तरूणाचा मृतदेह पोलिसांना लटकलेल्या अवस्थेत मिळाला. ही हत्या आहे की आत्महत्या याचा शोध पोलीस आता घेत आहेत. हा मुलगा १८ वर्षांचा असून त्याचे नाव दीपक असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाच्या मृत्यूसंबंधी रोहिणी पोलीस ठाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयातून एक फोन आला होता. त्यानंतर पोलीस या ठिकाणी गेले आणि त्यांना या मुलाचा मृतदेह आढळून आला. या मुलाने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

प्राथमिक तपासात  या मुलाचे इतर काही मुलांशी भांडण झाले होते अशी माहिती समोर आली. माझ्या मुलासोबत काही मुलांनी वाद घातला होता असा आरोप या मुलाच्या आईने केला. मुलाशी वाद घालणाऱ्या इतर मुलांनी माझ्या मुलावर चोरीचा आळ घेतला होता आणि त्याच्या बहिणीलाही त्रास देण्याचा प्रयत्न केला असेही मृत मुलाच्या आईने म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या मुलाने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2017 8:59 pm

Web Title: youth found dead in delhi police suspect foul play
Next Stories
1 काँग्रेसमध्ये नवी पिढी आली, पण… :पंतप्रधान नरेंद्र मोदी
2 जसप्रीत बुमराहच्या आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला
3 ट्रिपल तलाक, अल्लाउद्दीन खिल्जीवर प्रश्न; इतिहासाचा पेपर वादाच्या भोवऱ्यात
Just Now!
X