20 September 2020

News Flash

वडिलांनी पैसे दिले नाही, मुलाची फेसबुकवर सुसाईड नोट लिहून आत्महत्या

वडिलांनी जमीन विकली होती. त्यात तो हिस्सा मागत होता. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला.

एका युवकाने जमीन विकल्यानंतर आपल्या वडिलांना हिस्सा मागितला. मात्र तो न मिळाल्यामुळे त्याने नाराज होऊन फेसबुकवर सुसाईड नोट लिहून गळफास घेतला. ही घटना उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बांसडीह कोतवाली क्षेत्रातील केवरा गावात घडली. मृत युवकाच्या मागे पत्नी, दोन मुले आणि दोन मुली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय संतोष गुप्ता हा बटाट्याचा व्यवसाय करत होता. मोठ्याप्रमाणात कर्ज झाल्यामुळे तो तणावात होता. वडिलांनी जमीन विकली होती. त्यात तो हिस्सा मागत होता. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे नाही मिळाल्यानंतर त्याने फेसबुकवर फोटो सह सुसाईड नोट टाकली. त्यात त्याने काही वर्षांपूर्वी घरातील भांडणाचाही उल्लेख केला आणि अखेरीस मीही मरून जाईन असे लिहिले.

संतोष गुप्ता केवरा गावातील रहिवासी पारस नाथ यांचा सर्वांत छोटा मुलगा होता. संतोषच्या कुटुंबात पत्नी दीपमाला, दोन मुले युवराज व यशराज आणि दोन मुली तनिषा व प्रिया आहेत. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 12:35 am

Web Title: youth hanged himself after written suicide note on facebook
Next Stories
1 पश्चिम बंगालमध्ये तणाव कायम, योगी आदित्यनाथ आज पुरुलियात
2 ‘नरेंद्र मोदी कौरवांचे नेते, राहुल गांधी त्यांचा नाश करतील’
3 मोदी सरकारला मोठं यश, ब्रिटन सरकारकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी
Just Now!
X