मोबाइल खरेदीसाठी १० हजार रुपये न दिल्यामुळे मुलाने सावत्र आईचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाने आपल्या सावत्र आईचा गळा दाबून खून केल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील सरधाना परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खिजर (वय-२०) असं आरोपी मुलाचं नाव आहे. त्याने मंगळवारी दुपारी त्याच्या सावत्र आईकडे (रेश्मा, वय-३४) मोबाइल खरेदी करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. पण रेश्मा यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त खिजरने आपल्या सावत्र आईची गळा दाबून हत्या केली.
रेश्मा यांची हत्या केल्यानंतर आरोपी खिजरने वडिलांच्या दुकानात धाव घेतली आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मात्र तो फरार झाला. त्याचे वडिल, इबादुर्रहमान यांनी तातडीने सरधाना पोलिस स्थानकातील पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. ‘माहिती मिळताच आरोपी मुलाविरोधात एफआयआर दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. त्याच्या विरोधात पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे’, अशी माहिती सरधाना पोलीस ठाण्याचे प्रभारी ब्रिजेश कुमार यांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 1:28 pm