News Flash

Video : ‘भारताचा युवक हा भारतच नाही तर देशही घडवू शकतो’ काय बोलून बसले राहुल गांधी?

राहुल गांधी यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येते आहे

Video : ‘भारताचा युवक हा भारतच नाही तर देशही घडवू शकतो’ काय बोलून बसले राहुल गांधी?

भारताचा युवक हा भारतच नाही तर देशही घडवू शकतो. असं एक कुणालाही बुचकळ्यात पाडेल असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. भारत आणि देश हे दोन्ही वेगळे आहेत का? असा प्रश्न कुणालाही पडावा असंच हे राहुल गांधी यांचं वक्तव्य आहे. जयपूरमध्ये युवा आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान झालेल्या भाषणात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पाहा व्हिडीओ

Comedy Nights with રાહુલ બાબા #RahulGandhi pic.twitter.com/rojVcvnYCB

युवकच देश घडवू शकतो असं त्यांना म्हणायचं असावं. मात्र आपण काय बोलतो आहोत हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. “भारताचा युवक भारतच नाही तर देश घडवू शकतो” असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. भारत हाच आपला देश आहे हे बहुदा ते विसरुन गेले. राहुल गांधी यांच्या भाषणाची ही क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे. काहींनी या क्लीपला कॉमेडी नाईट्स विथ राहुलबाबा असं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी राहुल गांधी त्यांच्या पारंपरिक अवतारात परतले असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे.

आज झालेल्या याच भाषणात पंतप्रधान मोदींना अर्थशास्त्रातलं काहीही कळत नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. इतकंच नाही तर जीएसटी म्हणजे काय हेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजत नाही असंही राहुल गांधी म्हणाले होते. मात्र याच भाषणातली क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या क्लीमध्ये राहुल गांधी यांना काय म्हणायचं आहे तेच समजत नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांची सोशल मीडियावर खिल्ली मात्र मोठ्या प्रमाणात उडवण्यात येते आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 7:23 pm

Web Title: youth of india can not only change india but the entire nation says rahul gandhi scj 81
Next Stories
1 शरजील इमामची वक्तव्यं कन्हैय्या कुमारपेक्षा घातक-अमित शाह
2 पंतप्रधान मोदींशी चर्चेसाठी ममता बॅनर्जी ‘या’ अटीवर तयार
3 भारत बनवणार ५ हजार किमी रेंजचे बॅलेस्टिक मिसाइल, संपूर्ण आशिया, युरोप येणार रेंजमध्ये
Just Now!
X