27 February 2021

News Flash

‘ताज महाल’ पडला मुलीच्या वडिलांच्या डोक्यात! मुलगा पोहोचला तुरुंगात

लग्नाची मागणी घालण्यासाठी ताज महालची प्रतिकृती वापरणे एका २२ वर्षीय युवकाला चांगलेच महाग पडले आहे.

लग्नाची मागणी घालण्यासाठी ताज महालची प्रतिकृती वापरणे एका २२ वर्षीय युवकाला चांगलेच महाग पडले आहे. हा तरुण तुरुंगात पोहोचला आहे. या तरुणाचे शेजारी राहणाऱ्या मुलीवर प्रेम होते. तो बऱ्याच दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. सोमवारी रात्री त्याने ताज महालची प्रतिकृती गिफ्ट पॅक करुन तो बॉक्स मुलीच्या गच्चीवर फेकला.

दुर्देवाने तो गिफ्टचा बॉक्स मुलीच्या वडिलांच्या डोक्यावर जाऊन आदळला. त्यावेळी गच्चीवर ते भोजन करत होते. अचानक घरात येऊन पडलेल्या या ताज महालच्या प्रतिकृतीवरुन बराच गदारोळ झाला. पोलिसात या घटनेची तक्रार करण्यात आली. २० वर्षीय तरुणी आणि तिचे कुटुंबिय ताज महालची प्रतिकृती घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले व युवकाविरोधात तक्रार नोंदवली.

मागच्या काही महिन्यांपासून आरोपी युवक आपल्या मागे लागला होता. जेव्हा कधी मी घराच्या बाहेर पाऊल ठेवायची तेव्हा तो आपल्या मागे यायचा असे या तरुणीने पोलिसांना सांगितले. ताज महालची प्रतिकृती स्वीकारुन मी त्याच्या प्रेमाला मान्यता द्यावी यासाठी तो युवक आपल्या मागे लागला होता. पण मी कधीही ती प्रतिकृती स्वीकारली नाही असे तक्रारदार तरुणीने सांगितले. गिफ्ट नाकारले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सुद्धा आरोपीच्या भावाने दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 12:41 pm

Web Title: youth who use taj replica to gift now behind the bars
Next Stories
1 वेश्याव्यवसायापेक्षा डान्स बार केव्हाही चांगला – वर्षा काळे
2 इस्त्रोच्या सॅटेलाईटशी जोडले रेल्वे इंजिन, अचूक वेळ कळणार
3 राज्यात पुन्हा छमछम, राज्य सरकारच्या कठोर अटी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
Just Now!
X