28 January 2021

News Flash

FB, Twitter पाठोपाठ ट्रम्प यांना Google चाही दणका; YouTube अकाऊंट केलं बंद

नियमांचे उल्लंघन करत असल्याचा ठेवला ठपका

(मूळ फोटो : रॉयटर्सवरुन साभार)

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएपपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

“सध्या सुरु असणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला नवीन कंटेट (व्हिडीओ) काढून टाकला आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे,” असं यूट्यूबने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे. “या चॅनेलवरुन आता ‘किमान’ सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही”, असंही कंपनीने पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे. याचाच अर्थ ट्रम्प आता अध्यक्षपदावर असतानाच यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोणताही व्हिडीओ अपलोड करु शकत नाहीत. २० जानेवारी रोजी म्हणजेच सात दिवसांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे.

नक्की वाचा- आत्मनिर्भर टर्की; WhatsApp वर टाकला बहिष्कार, राष्ट्राध्यक्षांनीही सुरु केला ‘या’ ‘मेड इन र्की’ अ‍ॅपचा वापर

अनेक कंपन्यांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात

अमेरिकेच्या ‘संसदे’वरील हल्ल्यानंतर जागतिक महासत्तेचे मावळते अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यावर आता उद्योग जगतानेही बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील आघाडीच्या अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. यापूर्वीच ट्रम्प यांचे खाते ट्विटरने बंद केले होते. फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले.  फेसबुकचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकेरबर्क यांनी ट्रम्प यांना काहीही पोस्ट करण्याची परवानगी देणं धोकादायक ठरु शकतं, असं म्हटलं होतं.

यांनी घेतली ट्रम्प यांच्यापासून फारकत

अमेरिकेतील स्ट्राईप या ऑनलाईन पेमेंट सेवाप्रदात्या कंपनीने ट्रम्प यांच्याशी संबंधित व्यवहार थांबविले आहे. हे संकेतस्थळ अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्यासाठी प्रचार व प्रसार मोहिम आखत असे. शॉपिफाय तसेच गोफंडमी या ऑफलाईन व्यापार मंचानेही ट्रम्प यांच्यापासून फारकत घेतली आहे. गोफंडमी ही निधी उभारणी करणारी कंपनी आहे. ही कंपनी ट्रम्प समर्थकांच्या प्रवासाचे व्यवहार बघत असे.

नक्की वाचा >> सोशल नेटवर्किंग साईट्सवर अँगेला मर्केल संतापल्या, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरुन लगावला टोला

फोर्ब्सनेही रणशिंग फुंकले

ट्रम्प यांच्या विरोधात फोर्ब्सनेही रणशिंग फुंकले असून अमेरिकेतील कंपन्यांनी ट्रम्प यांच्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेऊ नये, असा इशाराच दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 11:49 am

Web Title: youtube removes new content uploaded to trump channel scsg 91
Next Stories
1 शेतकरी कुणाच्या तरी सांगण्यावरून आंदोलन करतायेत; हेमा मालिनी यांनी उपस्थित केली शंका
2 पाटणा हादरलं! इंडिगोच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या
3 धोनीलाही बसला बर्ड फ्लूचा फटका; कडकनाथ कोंबड्यांसंदर्भातील मोठी बातमी
Just Now!
X