18 July 2019

News Flash

‘वायएसआर’ यांच्या भावाचा संशयास्पद मृत्यू

त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याचे दिसत होते.

वाय. एस. विवेकानंद रेड्डी यांच्या मृतदेहावर काही जखमा आढळून आल्या आहेत. 

|| श्रीनिवास जनयला

आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे धाकडे बंधू वाय. एस. विवेकानंद रेड्डी (६८) हे कडापा जिल्ह्य़ातील पुलीवेन्दुला येथील आपल्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याचे दिसत होते.

शवविच्छेदन अहवालानुसार, विवेकानंद यांच्या डोक्यावर, उजव्या हातावर आणि मांडय़ांवर सात जखमा आढळल्या. पोलिसांनी प्रथम वेगळ्या कलमानुसार गुन्हा नोंदविला होता, मात्र नंतर हत्येचा गुन्हा नोंदविला. विवेकानंद यांच्या शरीरावर झालेल्या जखमांवरून त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचे सूचित होत आहे, असे कडापाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पी. बी. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले. गुरुवारी मध्यरात्री ते सकाळी पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत हत्या झाल्याचा संशय कडापाचे पोलीस अधीक्षक राहुल देव शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

विवेकानंद यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले  होते, मात्र घटनास्थळी अधिक तपास झाल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. या बाबत काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on March 16, 2019 1:09 am

Web Title: ys vivekananda reddy found dead at home