वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) या संस्थेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमकडून आर्थिक रसद पुरविण्यात आल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. झाकीर नाईकचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या आमिर गजधरकडून चौकशीदरम्यान ही माहिती पोलिसांनी दिली. त्यामध्ये दाऊद इब्राहिम आणि या संस्थेचे घनिष्ठ संबंध असल्याचे आमिरने म्हटले आहे. हे सर्व व्यवहार ‘हवाला’मार्फत झाले होते आणि त्यामध्ये सुलतान अहमद ही व्यक्ती मध्यस्थाची भूमिका पार पाडत होती, असेही गजधरने सांगितले. सक्तवसूली संचलनालयाने १६ फेब्रुवारीला गजधरला आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांखाली ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या अंदाजानुसार गजधरने झाकीर नाईकच्या संस्थेसाठी आतापर्यंत २०० कोटी रूपयांचे व्यवहार हाताळले आहेत. उत्त्पन्नाचा स्रोत लपविण्यासाठी आयआरएफने बनावट कंपन्या सुरू केल्या होत्या. त्यापैकी सहा कंपन्यांचा संचालक म्हणून मी काम पाहत होतो. त्यातील चार कंपन्या भारतातील असून दोन कंपन्या परदेशातील असल्याचेही गजधरने सांगितले.

आयाआरएफच्या पीस टीव्हीसाठी साधनसामुग्री खरेदी करण्यासाठी नाईक आणि आयआरएफमध्ये गजधरने २०० कोटी रूपयांचे अदानप्रदान केले होते. दाऊदने आयआरएफला मोठ्याप्रमाणावर निधी दिला होता. पाकिस्तान आणि दुबईमार्गे हा पैसा आणण्यात आला होता. याशिवाय, हवालामार्फत पैसा पुरविण्यासाठी कराची येथील काही उद्योगपतींनी मदत केल्याची माहितीही ईडीच्या हाती आली आहे. तसेच आयआरएफला सौदी अरेबिया, ब्रिटन आणि आफ्रिकन देशांमधूनही निधी पुरविला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका

यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडून झाकीर नाईकलाही समन्स बजावण्यात आले होते. चिथावणीखोर भाषणे करून तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यास प्रवृत्त केल्याचे झाकीर नाईक यांच्यावर आरोप झाल्यानंतर सरकारने त्यांच्या ‘पीस टीव्ही’ या वाहिनीवर आणि संकेतस्थळांवर बंदी घातली होती. एनआयए तसेच मुंबई पोलिसांनी त्याच्या मुंबईतील मालमत्तांवर छापा टाकून तपासणीही केली होती. नाईक यांनी त्यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेमार्फत पैशांची मोठय़ा प्रमाणात हेराफेरी केल्याचेही नंतरच्या तपासात सिद्ध झाले. दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल एनआयएने नाईक यांच्याविरोधात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल केला असून मुस्लीम तरुणांना भडकवण्याचे काम केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनीही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.  या तपासाचा पुढील भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने नाईक यांना समन्स बजावत जानेवारीच्या अखेरपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, नाईक ईडीच्या समोर झाला नव्हता. पोलिसांनी अटक करू नये म्हणून नाईक सौदी अरेबियात लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. नाईक यांनी अवैधरीत्या पैसे कुठून जमवले आहेत व त्यांचा गुन्ह्य़ांसाठी वापर कसा केला आहे याचा संचालनालय सध्या माग काढत आहे. यासाठी नाईकच्या घरातून व कार्यालयातून हस्तगत केलेली अनेक कागदपत्रेही तपासण्यात आली आहेत.