अल्लाह-ओ-अकबर तेहरीक या हाफिज सईदच्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. हाफिज सईद हा मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्याने पक्ष काढला त्यावेळी त्याच्यावर टीकाही झाली होती. आता त्याच्या पक्षाला पाकिस्तानच्या निवडणुकीत एकही जागा मिळाली नसल्याचे वृत्त आहे. इंडिया टुडेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
पाकिस्तानत पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये निवडणुकांमध्ये दोन चेहरे महत्त्वाचे मानले गेले आहेत. ज्यामध्ये इमरान खान यांना पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जाते आहे. तर दुसरे चर्चेतले नाव आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ. दहशतवादी हाफिज सईद याने जेव्हा त्याचा पक्ष सुरू केला आणि उमेदवार उभे केले तेव्हा पाकिस्तानची जनता त्याला कौल देणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता ज्याचे उत्तर आज मिळाले आहे. पाकिस्तानी जनतेने मतपेटीतून हाफिज सईदला साफ नाकारले आहे.
Allaha-u-Akbar Tehreek, the Political Party of Hafiz Saeed draws a blank in the Pakistan General Elections.
The venom spewing demagogue would have easily become a Chief Minister in India!
— Sanjiv Bhatt (IPS) (@sanjivbhatt) July 26, 2018
मुंबई हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी हाफिज सईद याने पाकिस्तानी विचारधारेसाठी मतदान करा असे आवाहन पाकिस्तानच्या जनतेला केले होते. हाफिज सईदचा मुलगा आणि जावई या दोघांनीही पक्षाचा जोरदार प्रचार केला होता. मात्र त्याच्या पक्षाला एकाही जागा मिळालेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 11:50 am