येत्या दोन वर्षांत आणखी १ कोटी मोफत गॅसजोडण्या

जास्तीत जास्त लोकांना स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा देण्याचा प्रयत्न

(संग्रहित छायाचित्र)

येत्या दोन वर्षांमध्ये देशात स्वयंपाकाच्या गॅसच्या आणखी १ कोटी मोफत जोडण्या दिल्या जाणार असून, जास्तीत जास्त लोकांना स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तेल सचिवांनी म्हटले आहे.

येत्या दोन वर्षांमध्ये गरजू लोकांना आणखी एक कोटी मोफत जोडण्या देण्याची आणि देशात जवळजवळ १०० टक्के स्वच्छ इंधन पोहोचविण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी स्वयंपाकाचा गॅस जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे, असे तेल सचिव तरुण कपूर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 1 crore more free gas connections in next two years abn

ताज्या बातम्या