scorecardresearch

श्रीलंकेत महागाईविरोधी आंदोलकांवर गोळीबार; एक ठार

श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट असून अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे.

कोलंबो : वाढत्या महागाईविरोधात श्रीलंकेत गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांचे सरकारविरोधात आंदोलन सुरू असून मंगळवारी या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले. रामबुक्काना येथे आंदोलक आणि पोलीस यांच्या धुमश्चक्री उडाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी थेट गोळीबार केला असून त्यामुळे एक आंदोलक ठार झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट असून अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. सरकारविरोधात रोष वाढत असून नागरिकांची मोठी आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी रामबुक्काना येथे रेल्वे रूळांवर बसून आंदोलकांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलकांना रूळांवरून उठण्यास सांगितले. मात्र ते हटले नाहीत, उलट त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे गोळीबार करावा लागला, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीची याचना

कर्जबाजारी झालेल्या श्रीलंकेला आर्थिक सहाय्य करावे, अशी शिफारस भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी निश्चितच यावर विचार करेन, असे श्रीलंकेच्या अर्थ मंत्रालयाने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 1 dead 10 injured in sri lanka after police open fire at anti government protesters over an economic crisis zws

ताज्या बातम्या