खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा खास तिहेरी नजराणा आज आकाशात पाहायला मिळणार आहे. हा दुर्मिळ योग पाहणं खगोलप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे. म्हणूनच या दुर्मिळ योगाबद्दल अशा १० गोष्टी जाणून घ्या ज्या तुम्हाला क्वचितच माहिती असतील.

– यापूर्वी १५२ वर्षांपूर्वी म्हणजेच ३१ मार्च १८६६ रोजी असा तिहेरी योग जुळून आला होता.

– २०१८ नंतर ३१ जानेवारी २०३७ मध्ये ‘सुपर-ब्ल्यू-ब्लड मून’ पाहाण्याचा तिहेरी योग येणार आहे.
– या काळात चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो म्हणून चंद्रबिंब आकाराने मोठे दिसते.
– आजच्या दिवशी चंद्र नेहमीपेक्षा १४ % मोठा आणि ३० % अधिक प्रकाशमान दिसणार आहे.
– आजच्या दुर्मिळ योगात ‘ब्ल्यू मून’ही दिसणार आहे पण, गंमत म्हणजे यादिवशी चंद्र निळ्या रंगाचा दिसत नाही. एका महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून’ असं म्हटलं जातं.
– आज चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगात पाहाण्याचा योग येणार आहे. या स्थितीला ‘ब्लड मून’ म्हटले जाते. खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने चंद्रबिंब लाल दिसते.

– सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा तिहेरी योग मुंबईकरांना पूर्व दिशेला पाहता येणार आहे.
– अनेक ठिकाणी १ तास १६ मिनिटे हे चंद्रग्रहण दिसणार आहे.
– खगोल शास्त्रज्ञांनी याला ‘स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स’ असं नाव दिलं आहे
– २६ मे २०२१ रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण असा दुहेरी योग येणार आहे.