कर्नाटकात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. म्हैसूर येथे बस आणि इन्होवा कारची समोरा-समोर धडक झाली आहे. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या चिंधड्या उडाल्या आहेत. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हैसूरमधील तिरुमकूडलु नरसीपुर येथे हा अपघात झाला आहे. बस आणि इन्होवा कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात इन्होवा कारच्या चिंधड्या उडाल्या. यात २ लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळतात पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच, जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ जण सुट्टीसाठी म्हैसूरला जात होते. त्यापूर्वी ते चामुंडी हिल्स, मेल माहादेश्वरा हिल्स आणि बिलिगिरिरंगा हिल्स पाहण्यासाठी गेले होते. हे सर्व बेल्लारीजवळील संगनकल्लू गावाचे रहिवाशी आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. “म्हैसूर येथे झालेल्या घटनेनं अत्यंत दु:ख झालं आहे. मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करतो. तसेच, जखमींना योग्य ते उपचार मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत,” असं सिद्धरामय्या यांनी ट्वीट करत सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 killed 1 injured innova private car and bus accident near mysor karnataka ssa
First published on: 29-05-2023 at 20:12 IST