पीटीआय, जम्मू : जम्मू- काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मुघल रोडवर अडकून पडलेल्या दहा प्रवाशांची लष्कर व पोलिसांच्या संयुक्त पथकाने सुटका केली. दहा प्रवासी असलेली सहा वाहने भूस्खलनामुळे मुघल रोडवरील पीर की गली या नेटवर्क नसलेल्या आणि दगडफेकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भागात अडकून पडली होती आणि खराब वातावरणाची त्यात भर पडली होती. लष्कर व पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बचावकार्य सुरू केले. चार मालमोटारी व दोन हलकी वाहने या ठिकाणी अडकून पडली असून, प्रवाशी जिवाच्या भीतीने हवालदिल झाल्याचे त्यांना आढळले, असे संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ‘या लोकांना धीर दिल्यानंतर, बचाव पथकाने तत्काळ रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर एक महिला व एक मुलगा यांच्यासह दहा जणांची सुटका करून त्यांना पोशाना येथील लष्करी चौकीवर आणण्यात आले’, असे हा प्रवक्ता म्हणाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 passengers rescued landslide affected areas passengers stranded police squad ysh
First published on: 29-05-2022 at 00:02 IST