गंभीर बातमी! देशात आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ; ‘ही’ ठरली प्रमुख कारणे

३,०२५ आत्महत्यांसह दिल्लीचे ५३ शहरांमध्ये प्रथम स्थान आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी आत्महत्यांमध्ये १०% वाढ झाली आहे. २०२० मध्ये देशात एकूण १,५३,०५२ आत्महत्या झाल्या. आत्महत्येचे प्रमाण ८.७% ने वाढले.

३,०२५ आत्महत्यांसह दिल्लीचे ५३ शहरांमध्ये प्रथम स्थान आहे. त्यानंतर चेन्नईमध्ये २,४३०, बेंगळुरू (२,१९६) आणि मुंबई (१,२८२) आत्महत्या झाल्या. या चार शहरांमध्ये मिळून एकूण ५३ शहरांमधील एकूण प्रकरणांपैकी ३७.४% प्रकरणे आढळून आली. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये चेन्नईने किंचित घट दर्शविली तर दिल्लीत २४.८%, बेंगळुरू ५.५% आणि मुंबईने ४.३% वाढ नोंदवली.

कौटुंबिक समस्या आणि आजार हे लोकांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडणारे प्रमुख घटक ठरले आहेत. गतवर्षी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मजुरी मिळवणारे, त्यानंतर स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती (पुरुष) आणि गृहिणींचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकूण १,०८,५३२ पुरुषांनी आपले जीवन संपवले, सर्वाधिक रोजंदारीवर काम करणारे (३३,१६४) त्यानंतर स्वयंरोजगार (१५,९९०) आणि बेरोजगार व्यक्ती (१२,८९३) असल्याचं NCRB अहवालात नमूद केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 10 per centjump in suicide at india last year delhi on top ncrb data vsk

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?