केरळमधील पाथनमथिट्टा येथील पोक्सो न्यायालयाने एका ४१ वर्षीय व्यक्तीला १४२ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषीला ५ लाखांचा आर्थिक दंडही ठोठावला आहे. संबंधित दोषीने १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) न्यायालयाने ही कठोर शिक्षा सुनावली आहे. दोषीने जर दंड भरला नाही तर, त्याला आणखी तीन वर्षांची शिक्षा भोगावी लागेल, असंही न्यायालयाने निकालात म्हटलं आहे. पाथनमथिट्टा जिल्ह्यात पॉक्सो प्रकरणात आरोपीला झालेली ही सर्वाधिक शिक्षा आहे.

आनंदन पीआर उर्फ ​​बाबू असं शिक्षा झालेल्या दोषीचं नाव असून त्याला ६० वर्षांचा सश्रम तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. शिवाय पोक्सो कायद्यातील विविध गुन्ह्यांसाठी एकूण १४२ वर्षाचा तुरुंगवास आणि ५ लाखांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. आरोपी बाबू हा पीडित मुलीचा नातेवाईक असून तो पीडितेच्या घरात वास्तव्याला होता. दरम्यान, २०१९ ते २०२१ या दोन वर्षाच्या कालावधीत आरोपीनं पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी तिरुवल्ला पोलिसांनी २० मार्च २०२१ रोजी आनंदन पीआर उर्फ बाबू याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा- मुलांसाठी खाऊ घ्यायला अजमेर स्टेशनवर उतरलेल्या महिलेवर बलात्कार

याबाबत अधिक माहिती देताना पाथनमथिट्टा पोलिसांनी सांगितलं की, तिरुवल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरिलाल यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांनीच या गुन्ह्याचा तपास केला. याप्रकरणी फिर्यादीचे वकील म्हणून जेसन मॅथ्यूज न पोक्सो न्यायालयात हजर झाले. याप्रकरणातील साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय नोंदी आणि पुरावे अशा सर्वच बाबी फिर्यादीच्या बाजूने होत्या. त्यामुळे न्यायालयाने दोषी आनंदन पीआरला बाल लैंगिक अत्याचारातील विविध गुन्ह्यांसाठी एकूण १४२ वर्षांची सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 years old minor girl raped by man for two years pocso court sentenced 142 years jail kerala rmm
First published on: 01-10-2022 at 19:06 IST