scorecardresearch

हिमाचल प्रदेशात १०० वर्षांपूर्वीचा पूल कोसळून तिघे जखमी

एक अतिसामान भरलेला ट्रक छैल या पर्यटनस्थळी जात असताना सोलन या ठिकाणाजवळील बैले हा ११० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल कोसळला.

एक अतिसामान भरलेला ट्रक  छैल या पर्यटनस्थळी जात असताना सोलन या ठिकाणाजवळील बैले हा ११० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल कोसळला. सफरचंदांच्या पेटय़ा असलेल्या ट्रकचे वजन तब्बल २० टन इतके होते. हा ट्रक शनिवारी अश्वनी खुदमध्ये कोसळला. त्यात तीन लोक जखमी झाले.
या पुलाची सामान वाहून नेण्याची क्षमता केवळ ९ टन इतकी आहे. परंतु ट्रकवाल्याने सामानक्षमतेची सूचना न वाचता आणि सुरक्षिततेचे कोणतेही उपाय न करताच ट्रक या पुलावरून नेला आणि त्यामुळे अपघात झाला, अशी माहिती सोलनचे जिल्हाधिकारी मदन चौहान यांनी दिली.
पतियाळाचे भूतपूर्व महाराज यांनी ब्रिटिश काळात १९०४ साली या पुलाची उभारणी केली होती. सोलन या ठिकाणापासून ४८ किलोमीटरवर असलेल्या साधुपूल येथे हा पूल आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 100 year old bridge collapses in himachal pradesh

ताज्या बातम्या