धक्कादायक! १०० वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार

१०० वर्षाच्या वृद्ध महिलेवर २० वर्षाच्या तरुणाने बलात्कार केला. पीडित महिला तिच्या घरामध्ये असताना ही दुर्देवी घटना घडली.

पश्चिम बंगालच्या चाकदाहा भागात धक्कादायक घटना घडली आहे. १०० वर्षाच्या वृद्ध महिलेवर २० वर्षाच्या तरुणाने बलात्कार केला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. पीडित महिला तिच्या घरामध्ये असताना ही दुर्देवी घटना घडली. पीडित महिलेच्या नातीने सांगितले कि, काही विचित्र आवाज ऐकल्यानंतर मी आजीला पाहण्यासाठी गेले.

मी जेव्हा खिडकीतून आता बघितले. तेव्हा समोरचे दृश्य बघून मला धक्का बसला. एक तरुण मुलगा माझ्या आजीवर बलात्कार करत होता. मी ते दृश्य पाहून आरडाओरडा करुन शेजाऱ्यांना गोळा केले. आम्ही या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली आहे.

ही घटना घडली त्यावेळी आरोपी दारुच्या नशेत होता. आपण काय करतोय हे त्याला ठाऊक नव्हते. चाकदाहा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला कल्याणी कोर्टात हजर करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 100 year old woman raped in west bengal

ताज्या बातम्या