दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे काश्मीर प्रशासनातील ११ कर्मचारी बडतर्फ

कुपवाडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काम करणारा एक कर्मचारी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सक्रिय असल्याचे आढळले.

हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सलाहुद्दीनच्या मुलांचा समावेश

दहशतवादी संघटनांसाठी काम करीत असल्याचा आरोप करून जम्मू-काश्मीर प्रशासनाने ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले असून त्यामध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याच्या दोन मुलांचा त्याचप्रमाणे पोलीस खात्यातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्या ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे ते जम्मू-काश्मीर पोलीस, शिक्षण, कृषी, कौशल्य विकास, ऊर्जा आणि आरोग्य खाते आणि शेर-ए-काश्मीर वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कर्मचारी आहेत. घटनेच्या अनुच्छेद ३११ नुसार यांना बडतर्फ करण्यात आले असून त्यांच्याकडे या कारवाईविरोधात केवळ उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे.

हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याची दोन मुले सय्यद अहमद शकील आणि शाहीद युसुफ यांना दहशतवादाला आर्थिक साहाय्य केल्याच्या आरोपाखाली सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या दोघांचा दहशतवादाला आर्थिक साहाय्य करण्यात हात असल्याबाबत तपास केला. तेव्हा पैशांची व्यवस्था करणे, पैसे स्वीकारणे आणि हवालामार्फत ते पैसे हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी कारवायांसाठी हस्तांतरित करणे यामध्ये या दोघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुपवाडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काम करणारा एक कर्मचारी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सक्रिय असल्याचे आढळले. दहशतवाद्यांना सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती देण्याचे आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे काम तो करीत होता. त्याचप्रमाणे अनंतनाग जिल्ह्यातील दोन शिक्षक देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचेही आढळले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 11 employees of kashmir administration working for terrorist organizations go to bad akp

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या