जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे एक बस दरीत पडल्याने ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या १४ जणांपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

या अपघाताची माहिती मिळताच मदत करण्यासाठी बचाव पथक आणि भारतीय लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

drunk farmer beaten up and robbed by two prostitute
नागपूर : मौजमस्ती करण्यासाठी शेतकरी गंगाजमुनात गेला, पुढे झाले असे की…
S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरुन या अपघातामध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत दु:ख व्यक्त केलं आहे. “जम्मू काश्मीरमधील दोडा येथे झालेल्या अपघाताबद्दल ऐकून वाईट वाटलं. या अपघातामध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शोक व्यक्त करतो.,” असं शाह म्हणाले आहेत. तसेच त्यांनी जखमींना लवकर आराम मिळावा यासाठी प्रार्थनाही केलीय.

या अपघातासंदर्भात आपण जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा केली असून शक्य ती सर्व मदत केली जाईल आणि जखमींवर उपचार केले जातील अशा शब्द केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलाय.