scorecardresearch

तामिळनाडूमध्ये रथयात्रे दरम्यान विजेच्या धक्क्याने ११ जण ठार, १५ जण जखमी, उघड्या तारांना रथाचा स्पर्श झाल्याने झाली दुर्घटना

तंजावर इथल्या दुर्घटनेची दखल घेत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी मदत जाहीर केली आहे

11 killed after temple chariot hits high-tension cable during procession
11 killed after temple chariot hits high-tension cable during procession

तंजावर इथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पहाटे तीनच्या सुमारास दुर्घटना घडली. ५० पेक्षा जास्त जण रथ ओढत असतांना रथाच्या कळसाचा स्पर्श उघड्या वीजवाहक तारांना झाल्याने बसलेल्या वीजेच्या झटक्यात २५ पेक्षा जास्त होरपळून निघाले. या दुर्घटनेत ७ जणांचा तात्काळ मृत्यु झाला, तर चार जण उपचारादरम्यान दगावले असून १५ जण जखमी झाले आहेत, जखमीपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान मोदी यांनीही या दुर्घटनेची दखल घेतली असून पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मृतांच्या नातेवाईंकाना दोन लाख तर जखमींना ५० हजारांची मदत देऊ केली आहे. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 11 killed after temple chariot hits high tension cable during procession in thanjavur tamil nadu asj

ताज्या बातम्या