चीनमधील आगीत ११९ मृत्युमुखी

चीनच्या ईशान्येकडील एका पोल्ट्री कारखान्यास लागलेल्या आगीत ११९ जण मृत्युमुखी पडले असून, ५४ जण जखमी झाले आहेत. जिलिन प्रांताच्या देहुई शहरातील मिशाझी भागात असलेल्या जिलिन पोल्ट्री कंपनीत सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हे अग्नितांडव घडले.

चीनच्या ईशान्येकडील एका पोल्ट्री कारखान्यास लागलेल्या आगीत ११९ जण मृत्युमुखी पडले असून, ५४ जण जखमी झाले आहेत. जिलिन प्रांताच्या देहुई शहरातील मिशाझी भागात असलेल्या जिलिन पोल्ट्री कंपनीत सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हे अग्नितांडव घडले. चीनमध्ये गेल्या दशकभरातील ही सर्वात भीषण दुर्घटना ठरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आतापर्यंत ११९ जण मरण पावले असले तरी मृतांची संख्या वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. हे अग्निकांड घडले तेव्हा कारखान्यात ३०० हून अधिक कामगार होते. या आगीचे कारण समजू शकले नाही, परंतु एका प्रत्यक्षदर्शीने त्या ठिकाणी स्फोटाचा आवाज ऐकला तसेच द्रवरूप अमोनियाच्या गळतीचाही त्याने संशय व्यक्त केला. या संबंधीची माहिती सीसी टीव्हीवरून देण्यात आली. कारखान्यातील वीजयंत्रणेत पडलेल्या ठिणग्यांवरूनही ही आग लागली असावी, असा संशय आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 119 died in china fire

ताज्या बातम्या