इस्लामाबाद : अफगाणिस्तानात आलेल्या ६.८ रिश्टर स्केलच्या तीव्र भूकंपामुळे अफगाणिस्तानसह पाकिस्तानलाही हादरे बसले. त्यामुळे दोन्ही देशांतील सुमारे १२ जण ठार, तर २५० जण मृत्युमुखी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
पाकिस्तानी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या हिंदूकुश प्रदेशात १८० किलोमीटर खोलीवर होते. हे धक्के राजधानी दिल्ली परिसरासह उत्तर भारतातील अनेक भागांत जाणवले. पाकिस्तानात लाहोर, इस्लामबाद, रावळिपडी, क्वेट्टा, पेशावर, लक्की मारवत, गुजरनवाला, सियालकोट, कोट मोमिन, चकवाल, कोहाट आणि गिलगिट-बाल्टिस्तान भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. वाहिनींच्या चित्रफितीत भयग्रस्त नागरिक रस्त्यांवर उतरल्याचे दिसत होते.
हिमाचल प्रदेशात सौम्य भूकंप
हिमाचल प्रदेशमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला. त्याचा केंद्रिबदू किन्नौरमध्ये होता. त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी मंगळवारी रात्री १० वाजून १७ मिनिटांनी अफगाणिस्तानातील भूकंपाचे धक्के हिमाचल प्रदेशात जवळपास सर्व भागांत म्हणजे १२ जिल्ह्यांत जाणवले.
सिमला, मंडी इत्यादी अनेक ठिकाणचे रहिवासी घाबरून घराबाहेर पडले होते; परंतु सुदैवाने अद्यापपर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे विशेष आपत्ती व्यवस्थापन सचिव सुदेश मोक्ता यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत भारतासह लगतच्या देशांत भूकंपाचे दहाहून अधिक धक्के जाणवले. त्यांची तीव्रता ३ ते ४ रिश्टर स्केलदरम्यान होती, असेही त्यांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशात सौम्य भूकंप
हिमाचल प्रदेशमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला. त्याचा केंद्रिबदू किन्नौरमध्ये होता. त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत भारतासह लगतच्या देशांत भूकंपाचे दहाहून अधिक धक्के जाणवले.