scorecardresearch

Premium

VIDEO: बंगळुरूमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू

बंगळुरू शहरातील अट्टीबेले येथे एका फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

fire (1)
फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग (फोटो सौजन्य-एएनआय)

कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहरातील अट्टीबेले येथे एका फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. ही आग आता नियंत्रणात आणली आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

ही आग नेमकी कशामुळे लागली? याची माहिती अद्याप समोर आली नाही. आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. आगीच्या या घटनेनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमी झालेल्या लोकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
mutton party after killed his sister-in-law police arrested the criminal
वहिनीचा खून करून सराइत गुन्हेगाराची मटण पार्टी; ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात
throws puppy noida
संतापजनक! सात वर्षांच्या मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला २० फुटावरून फेकलं, FIR नंतर रहिवाशांचे आंदोलन
MUMBAI roads
मुंबई : रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प, रस्त्यांच्या महानिविदेतील केवळ ११ रस्त्यांची कामे पूर्ण

“बंगळुरू शहरातील आणेकल जवळील फटाक्यांच्या दुकानात लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं. मी उद्या अपघातस्थळी जाऊन पाहणी करणार आहे. मृत कामगारांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत”, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 12 deaths after fire broke out in firecracker store in bangalore viral video karnataka rmm

First published on: 07-10-2023 at 23:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×